आईची बाजू घेतो म्हणून बापानेच आपल्या अल्पवयीन मुलाला…..
नेहमीच आईची बाजू घेतो म्हणून बापानेच आपल्या अल्पवयीन मुलाला अत्यंत क्रूर पद्धतीने संपविल्याची निर्दयी घटना जिल्ह्यात घडली आहे. गळफास देऊन मृत्यू होत नसल्याने लक्षात येताच निर्दयी बापाने मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला. बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील 35 वर्षीय बाबूराव शिखरे याची पत्नी हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरात माहेरी निघून गेली होती. पत्नी आपल्याला सोडून माहेरी रात असल्याने बाबूराव शिखरे यांच्या मनात राग होता. पत्नी आपल्यासोबत नांदायला येत नसल्याने बाबूराव हा नेहमी पत्नीला अर्वाच्च भाषेत बोलत होता.
हेही वाचा :- कल्याणात मद्यपीचा रुग्णालयात धिंगाणा
हे लहानग्या 13 वर्षीय मुलाला आवडत नव्हते. तो आईच्या बाजूने आहे, हे बापाच्या लक्षात आले. याचाही राग बाबूरावच्या मनात होता. आपला मुलगा आईची बाजू घेऊन आपल्याला बोलता म्हणून 13 वर्षीय पोटच्या वैभवचा बापानेच काटा काढला. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास बापाने मुलाला फसवून चल तुला मामाच्या घरी नेतो म्हणून वैभवला ऑटोरिक्षात बसवले. हिंगोली – नांदेड महामार्गावरील कुर्तडी पाटीवर मुलाला नेले. तेथे त्याला मारहाण केली. दोरीने आपल्या मुलाला गळफास देऊन गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. पण गळफास देऊन ही मुलगा जीवंत असल्याचे बघून त्याच्या डोक्यात दगड टाकून मुलाचा अमानुष पद्धतीने खून केला. पोलिसांनी क्रूर बापाला ताब्यात घेतले असून बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.