शेतकऱ्यांचे कल्याण हा नव भारताचा अविभाज्य घटक : राधा मोहन सिंह
नवी दिल्ली, दि.३१ – ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधानांचा मंत्र असून शेतकऱ्यांचे कल्याण हा नव भारताचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी केले. नवी दिल्ली येथे आयसीएआर संस्थेचे संचालक आणि राज्यातल्या कृषी विद्यापीठांचे कुलगुरु यांच्या परिषदेत ते आज बोलत होते. सरकारने कृषी विकासासाठी आणि कृषीमध्ये आमुलाग्र बदल घडवण्यासाठी अनेक योजना राबवल्या असे त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका दिल्या तसेच मृदा परिक्षणासाठी छोट्या प्रयोगशाळा विकसित केल्या असे ते म्हणाले. हवामान बदलामुळे येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी 45 एकात्मिक कृषी व्यवस्था मॉडेल्स विकसित करण्यात आले.
हेही वाचा :- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेले निवेदन
ज्याचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना झाला. देशात कृषी संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या त्याशिवाय कृषी विद्यापीठेही सुरु करण्यात आली असे त्यांनी सांगितले. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे चालू वर्षात अन्न धान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे असे ते म्हणाले. कृषी प्रगतीसाठी सरकार अवकाश तंत्रज्ञानाचाही वापर करत असून डिजिटल आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचाही कृषी संशोधनात लाभ होत आहे. सरकारच्या ‘मेरा गांव, मेरा गौरव’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवले जात आहे. या योजनेअंतर्गत चार शास्त्रज्ञांच्या समूहाने पाच गांव दत्तक घेतली असून त्या गावातल्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जात आहे अशी माहिती राधा मोहन सिंह यांनी दिली.