* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> बहुचर्चित ठकसेन जगदीश वाघ अत्यवस्थ जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

बहुचर्चित ठकसेन जगदीश वाघ अत्यवस्थ जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

कल्याण दि.१५ :- सीकेपी बँकेला ३० कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली १८ नोव्हेंबर रोजी डोंबिवली पोलिसांनी अटक केलेला ठकसेन जगदीश शिवानंद वाघ (४७) हा सद्या न्यायालयीन कोठडीमुळे कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात आहे. मात्र शुक्रवारी अचानक अत्यवस्थ झाल्याने त्याला तुरूंगातून मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. वाघ बेशुद्धावस्थेत असल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. जगदीश वाघ हा डोंबिवलीच्या निवासी विभागातील आर एक्स ३७, सोनाटा कॉम्प्लेक्समध्ये राहतो.

हेही वाचा :- डोंबिवलीच्या पॉजकरांनी उल्हासनगरातील कुत्र्यांना केले रेबिजमुक्त

बांधकाम व्यावसायिक असलेला जगदीश वाघ याला रामनगर पोलिसांनी सीकेपी बँकेला ३० कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली १८ नोव्हेंबर रोजी बेड्या ठोकल्या होत्या. ७ दिवसानंतर त्याला मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार होते. तथापि या ठकसेनाने आदल्या दिवशीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. मात्र पोलिसांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजल्याचा सुमाराला मुबंई विमानतळावरून त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. त्यामुळे पोलिसांनी ठकसेन वाघच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे कस्टडीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या ३ पोलिसांवर बेजबाबदारपणा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई करावी लागली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कोर्टाने त्याचा जामीन नामंजूर केला.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

त्यामुळे त्याची आधारवाडी तुरूंगात रवानगी करण्यात आली. हे सर्व घटनाक्रम सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने तुरूंगात तो अत्यवस्थ झाला. तुरूंग प्रशासनाने त्याला तात्काळ स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यामुळे वाघ याच्या बंदोबस्तासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वाघ याची अतिदक्षता विभागात व्यवस्था न झाल्यामुळे त्याला सर्वसाधारण कक्षातच उपचार सुरू करण्यात आले आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह आजारामुळे सद्या तो बेशुद्धावस्थेत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *