बनावट संकेतस्थळ
नवी दिल्ली दि.१२ – महिला आणि बालविकास मंत्रालयाचे नाव आणि लोगो वापरुन शिक्षक आणि इतर पदांसाठी भर्तीची जाहिरात देणाऱ्या बनावट संकेतस्थळाच्या दोन घटनांची मंत्रालयाने दखल घेतली आहे. दोन्ही घटनांमध्ये अर्जदारांना परीक्षेचे ऑनलाईन शुल्क भरण्यास सांगण्यात आले होते. मंत्रालयाने दोन्ही प्रकरणांची दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यातल्या एका घटनेतील व्यक्तीला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
Please follow and like us: