रविवारी सकाळपासून फेसबूकची सेवा ठप्प

मुंबई – रविवारी सकाळपासून लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबूकची सेवा ठप्प झाली. भारताबरोबरच जगभरात फेसबूकची सेवा बंद झाली असल्याने कोट्यवधी युझर्स त्रस्त झाले . फेसबूक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर युझर्सना स्वत:ची प्रोफाइल दिसत होता मात्र न्यूज फिड बंद असल्याने इतरांच्या पोस्ट, फोटो दिसत नव्हते. मात्र फेसबूकवर स्टेटस, तसेच फोटो अपलोड होत होते. दरम्यान, फेसबूक डाऊन झाल्यानंतर युझर्सनी ट्विटर तसेच अन्य सोशल मीडिया साइट्सवरून आपली तक्रार देण्यास सुरुवात केली. अखेरीस भारतीय वेळेनुसार सकाळी 10.50 च्या सुमारास फेसबूकची सेवा पुन्हा सुरू झाली.

हेही वाचा :- कल्याण ; लहान मुलांचे भांडण सोडवणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाला मारहाण

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email