प्राप्तीकर विवरण पत्र आणि लेखा अहवाल भरण्याच्या अंतिम तारखेला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली, दि.२४ – आर्थिक वर्ष 2018-19 साठीचे प्राप्तीकर विवरण पत्र आणि लेखा अहवाल भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2018 वरुन 15 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक करदात्यांनी केलेल्या विनंतीवरुन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ही मुदतवाढ केली आहे. मात्र, प्राप्तीकर कायदा 1961 च्या 234 अ या कलमांतर्गत कर भरणाऱ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत कर न भरल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email