रेल्वेजाळ्याचा विस्तार
नवी दिल्ली, दि.०६ – देशात गेल्या दोन वर्षात विविध राज्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्यात आला आहे. यात नवे रेल्वे मार्ग, दुहेरीकरण आणि गेज परिवर्तनाच्या कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन, वैधानिक मान्यता अशा अनेक बाबींसाठी मंत्रालयांबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मान्यतांची आवश्यकता असते.
२०१६- १७ या वर्षात महाराष्ट्रात अशा प्रकारे ७५ किलोमीटर मार्गाचे काम झाले तर २०१७ -१८या वर्षात ११८.८८ किलोमीटर मार्गाचे काम झाले.
रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Please follow and like us: