डोंबिवलीत अस्सल पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांची उत्फूर्त प्रतिसाद…

डोंबिवली दि.३० – पुणेरी पाट्या हा सर्वांचा कुतूहलाचा विषय आहे. आजवर आपण सोशल मिडीयावर पुणेरी पाट्या वाचल्या जात होत्या. मात्र डोंबिवलीत प्रथमच अस्सल पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.या पाट्या वाचण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.डावखर इन्फास्त्रचर प्रा.लिमिटेड आणि रिजेन्सी ग्रुपच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले.दोन दिवशीय प्रदर्शनाला सुमारे ४० शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली लावली होती. त्याचबरोबर शालेय जीवनात पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून यावेळी प्लास्टिक बंदीबाबत करण्यात आली. रंगाचे दुकान-तुमची सर्व स्वप्न हवी तशी रंगवून मिळतील, चहाची वेळ नसते, वेळेला चहाच, मला एकदा पुसा नाहीतर विका, आयुष्यात चढ-उतार असणारच, दवाखान्यातला ई.सी.जी. सुद्धा सरळ रेषेत आला.

हेही वाचा :- जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

तर तुम्ही जिवंत नसता, ४G ऐवजी २G घेतली तर राहिलेल्या पैसात भाजी घेता येईल ती पण ताजी ,येथे दारू पिऊन बसल्यास अथवा झोपल्यास पाणी ओतून दोन कानाखाली वाजवून १०० रुपये दंड करून पोलीसांच्या ताब्यात देण्यात येईल. या अश्या अनेक पुणेरी पाट्या वाचण्यातशालेय विद्यार्थी दंग झाले होते.या प्रदर्शनासंदर्भात संतोष डावखर यांना विचारले असता ते म्हणाले, कुतूहलाचा विषय म्हणून विको नका येथील रिजन्सी अंतनम येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाबाबत विचारले असता ते म्हणाले, पुणेरी पाट्या हा अगदी कुतूहलाचा विषय आहे.शालेय विद्यार्थ्यांना पुणेरी पाट्या वाचायला खूप आवडते. तसेच सरकारने जरी प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावनी होणे आवश्यक आहे.प्लास्टिकचे दुष्परिणाम काय काय असतात यासंदर्भात जनजागृती होण्याची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिक रिसायकलिंग सारखे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email