‘महारेरा’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५७ दलालांची २० मे रोजी परीक्षा
मुंबई दि.१३ :- स्थावर संपदा क्षेत्रातील जुन्या – नव्या दलालांना ‘महारेरा’चे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयानुसार ४५७ दलालांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून या पात्र दलालांची इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेच्या माध्यमातून २० मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच
अखिल भारतीय स्थानिक स्वयं प्रशासन संस्थेने (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नस) यासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. तर आयबीपीएसच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी ५२३ दलालांनी नावे नोंदविली होती. ही पहिली परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक आदी १० शहरांतील परीक्षा केंद्रावर होणार आहे.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात स्वतंत्र बालक्षयरोग उपचार कक्ष सुरू होणार
मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातून घर खरेदी-विक्री व्यवहार करतात. पण अशावेळी अनेकदा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण नाही. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी महारेराने महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.