सगळे करतात बाप्पाचे विसर्जन, तरुण करतात पर्यावरणाचे रक्षण
डोंबिवली – गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य विसर्जनाच्या वेळी जलस्त्रोतात टाकल्याने होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्मल युथ फाउंडेशन च्या वतीने निर्माल्य संकलन करून खत निर्मिती प्रकल्पास देण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात ११ ठिकाणीं निर्मल युथ फाउंडेशन च्या वतीने सुमारे २०० स्वयंसेवकांसोबत निर्माल्य संकलनाचे काम करण्यात आले.
दिनांक १ सप्टेंबर, ४ सप्टेंबर, ५ सप्टेंबर , ९ सप्टेंबर रोजी कोपर, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखाणपाडा, आयरे गाव, नांदिवली, खंबालपाडा, दत्तनगर चौक, ट्राफिक बगीचा, अंबिका मैदान इ. ठिकाणीं प्रगती महाविद्यालय व दि. एस. आय. ए. महाविद्यालयातील एन. एस. एस. युनिट च्या स्वयंसेवकांनसोबत प्रत्येक घाटावरील निर्माल्य वेगळे करण्यात आले.
जलस्त्रोतांमध्ये निर्माल्य व प्लास्टिक टाकल्याने प्रदूषण वाढते व जलचराना त्याचा त्रास होतो. पर्यावरणीय अधिवासास यामुळे धोका निर्माण होतो. व जैवविविधता नष्ट होऊन पर्यावरणाचा ह्रास होतो.
यासर्वांच्या बचावाखातीर निर्मल युथ फाउंडेशन सुमारे ७ वर्षापासून या कामासाठी सज्ज आहे.
यंदा ११ घाटानवरून सुमारें २९ टन ६५० किलो ओला कचरा व ८ टन ९४० किलो सुका कचरा वर्गीकरण करण्यास आम्ही यशस्वी झालो.
निर्मल युथ फाउंडेशन च्या अध्यक्षा कु. अक्षता औटी व उपाध्यक्षा सौ. विनिता चाहेर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण उपक्रम पार पडला. पर्यावरण दक्षता मंडळाच्या सौ. रुपाली शैवले यांचे मार्गदर्शन व कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे उपायुक्त माननीय श्री अतुल पाटील यांनी भेट देऊन मुलांचे प्रोत्साहन वाढवले.
तसेच कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे अधिकारी व स्थानिक नगरसेवकांकडून मोलाचे योगदान लाभले. हि माहिती निर्मल युथ फाउंडेशन च्या उपाध्यक्षा सौ. विनिता चाहेर व स्वयंसेवक यश पवार यांसकडून देण्यात आली