समाज माध्यमांच्या आक्रमणातही मराठी नाटक आणि प्रेक्षक टिकून राहील

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा विश्वास

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.३० :- माहिती- तंत्रज्ञानाच्या महाजालात आणि समाज माध्यमांच्या वाढत्या आक्रमणातही मराठी नाटक आणि प्रेक्षक टिकून राहील, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी येथे व्यक्त केला. डोंबिवली रेल्वेस्थानकाजवळील इंदिरा चौकातील कडोंमपाच्या डोंबिवली कार्यालयातील नाटकांच्या तिकीट खिडकी केंद्राचे उदघाटन शनिवारी अभिनेते दामले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌

हेही वाचा :- मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन

मराठी नाट्य परंपरेला पावणे दोनशे वर्षाचा इतिहास असून नाट्य संस्कृती महाराष्ट्रात खोलवर रुजली आहे. त्यामुळे मराठी नाटके येत राहतील आणि नाटकाची प्रेक्षक संख्याही वाढतच राहील, असेही दामले यांनी सांगितले. डोंबिवलीकर नाट्यरसिकांना सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे जाऊन नाटकाची तिकीटे खरेदी करणे अडचणीचे, गैरसोयीचे होते. त्यामुळे महापालिकेने रेल्वे स्थानकाजवळ ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रेक्षकांनी नियमित तिकिटे खरेदी करुन अधिकाधिक नाटके पाहावीत असे आवाहनही दामले यांनी केले.

हेही वाचा :- छटपूजा अर्थात सूर्यपूजा

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा, साहाय्यक आयुक्त संजय साबळे यावेळी उपस्थित होते.‌

Leave a Reply

Your email address will not be published.