पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने सहभागी व्हावे पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे

मुंबई दि.२० – एकदाच वापरता येणा-या प्लास्टिकला सशक्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने मोलाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुधंरा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
एकदाच वापरता येणा-या प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरतात येतील अशा वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण धारावीतील दोन शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्पास सुरुवात

प्रदर्शनाचे उदघाटन दराडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.‌ एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या वस्तू. उदा. प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिक प्लेटस्‌, प्लास्टिकच्या वाट्या, हॉटेलमधून अन्नपदार्थ ग्राहकांना पोहोचविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे डबे, स्ट्रॉ, प्लास्टिक पिशव्या या वस्तूंना पर्याय असणाऱ्या वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

प्रदर्शनात नारळाच्या विविध घटकांपासून तयार करण्यात आलेले चमचे, वाट्या, प्लेटस्‌, कापडांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पिशव्या, आभूषणे, नारळाच्या झावळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, बांबूपासून तयार करण्यात आलेली आभूषणे, वर्तमानपत्राच्या रद्दीतून तयार करण्यात आलेल्या पेन्सिल, रिसायकल पेपरमधून तयार केलेले पँकिंग साहित्य व बेंचेस, टी पॉय अशा अनेक नाविन्यपूर्ण वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *