चकमक फेम प्रदीप शर्मा ह्यांना NIA कडून अटक

मुंबई – गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा ह्यांना राष्ट्रीय तपास यंत्रेणे (NIA ) कडून अटक करण्यात आली .प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते . आज सकाळी सहा वाजता राष्ट्रीय तपास यंत्रेणे प्रदीप शर्मा ह्यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली आणि त्यांना तीन तासाच्या चौकशी नंतर अटक करण्यात आली .
काही दिवसा पूर्वी तपास यंत्रणे तर्फे दोन लोकांना अटक करण्यात आली होती . त्या दोघामधून एक जण प्रदीप शर्मा ह्यांचा खबरी पण होता . त्या खबरी च्या कबुली नंतर प्रदीप शर्मा ह्यांच्या घरावर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रेणे धाड टाकली . ह्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये ह्या साठी सी आर पी एफ च्या आठ तुकड्या घरा बाहेर तैनात करण्यात आल्या होत्या .

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email