आवरे येथे भारतीय शहीदांना भावपूर्ण श्रधांजलि
उरण दि.१९ – अपनी आजादी को हरगिज मिटा सकते नही सर काटा सकते लेकिन सर झूका सकते नही ! जिगरबाज भारतीय सैनिकांची ताकत जगात एक नंबर आहे परंतु नापाक इरादे असणाऱ्या या पाकिस्तान च्या पुलमाव येथे पूर्वनियोजित CRPF च्या भारतीय जवानांवर दशहादवाद्यांच्या स्फोटका द्वारे केलेल्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय वीर 44 शहिद जवानांना कै. मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे चे अध्यक्ष कौशिक ठाकुर व देशप्रेमी ग्रामस्थ आवरे यांनी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सैनिकांचे मनोधर्या उंचविण्यासाठी तसेच जवानाच्या कुटुंबीय आणि भारत मातेच्या सुपुत्रांच्या प्रती आदर, प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी आवरे ग्रामस्थ, भारतमातेचे सुपुत्र मेजर संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिकांप्रती आदरणीय भावना बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.
हेही वाचा :- शिवजयंती सोहळा २०१९ (वर्ष ४ थे) निमित्त भव्य रांगोळीतून साकारले श्री शिव छत्रपती.
यात भारतीय जवान जिंदाबाद ! पाकिस्तान मुर्दाबाद अश्या घोषणा नागरीकांनी दिल्या. श्रद्धांजली देण्याकरिता प्रामुख्याने कै. मधुकर ठाकुर प्रतिष्ठान आवरे चे संस्थापक अध्यक्ष कौशिक ठाकुर,दिनेश्वर गाताडी ,सुनील वर्तक, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, सुनील ठाकूर, संतोष पाटील,महेश भोईर ,निवास गावंड, जनार्दन म्हात्रे,हितेंद्र म्हात्रे, निलेश गावंड, साईनाथ गावंड, संतोष म्हात्रे, विध्याधर गावंड, दिनेश म्हात्रे ,शिवकुमार गावंड, महादेव गावंड ,शेखर म्हात्रे, निलेश पाटील, रोहिदास ठाकूर, रामा म्हात्रे,शिवप्रेमी ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुलवाम शाहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्रधांजली अर्पित करत असताना उपस्थित संपूर्ण देशप्रेमी नागरिक भावुक झाले होते.