* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड

 

भारतीय मजदूर संघाच्या भुवनेश्वर आडिसा इथे 26,27,28 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या तीन दिवसिय अखिल भारतीय कार्य समितीच्या बैठकीत नागपूर (महाराष्ट्र) येथील भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्रजी हिमते यांची भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

यापूर्वी महामंत्री या पदावर कार्यरत असलेले बिनय कुमार सिन्हा यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे जून 2022 मध्ये महामंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्या नंतर रविंद्र हिमते यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

रवींद्र हिमते हे मूळचे नागपूर येथील असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विभागीय लेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. भारतीय मजदूर संघातील गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असून नागपूर जिल्हा मंत्री, विदर्भ प्रदेश पदाधिकारी, परिवहन मजदूर महासंघ, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सचिव, उद्योग प्रभारी ते राष्ट्रीय महामंत्री असा त्यांचा भारतीय मजदूर संघातील प्रवास आहे.

मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, देशभर प्रवास ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणुरे, प्रदेशाचे सर्व पदाधिकारी , सर्व उद्योग व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रविंद्रजी हिमते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *