बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश नहार यांची निवड
मुंबई दि.०४ :- बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे ( पुणे) त्रैवार्षीक महाअधिवेशन नुकतेच पुणे येथे पार पडले. अधिवेशनाचे उदघाटन मनमोहन दास यांच्या हस्ते झाले.
एक्झिमा आणि बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण
प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गदादे, मोहन येनुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अधिवेशनात पाच दिवसांचा आठवडा, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे आणि इतर विषयांवर चर्चा झाली. दिनेश कुलकर्णी (उपाध्यक्ष), महादेव शेडगे (सरचिटणीस) यांची निवड करण्यात आली.