Election news update ; ‘अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?’ – अजित पवार

मुंबई दि.२० :- शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात एक रुपयांमध्ये आरोग्य तपासणी करु, अशी घोषणा केली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना निशाणा साधला. गेल्या पाच वर्षांपासून उद्धव ठाकरे भाजपसोबत सत्तेत आहेत. अरे उद्धवा पाच वर्षे तुमचे सरकारच होते. तुमचे मंत्री त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यावेळी 1 रुपयात आरोग्य तपासणी का नाही केली? किती खोटे बोलाल. पाच वर्षांपूर्वी अशीच खोटी आश्वासने देऊन मते मागितली होती. एकही शब्द त्यांनी पाळला नाही.

हेही वाचा :- तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, – उद्धव ठाकरे

भाजपने म्हणायचे कर्जमाफी आणि शिवसेनेने म्हणायचे कर्जमुक्तीचा नारा दिला पण प्रत्यक्षात शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच नाही. पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील 45 वर्षांत बेरोजगारीचा आकडा एवढा वाढला नव्हता, असे अजित पवार यावेळी म्हणाले., सातारा येथे शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात सभा गाजवली होती. पाऊस असतानाही या सभेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यामुळे येत्या निवडणुकीत आपल्या बाजूने निर्णय लागेल, असा अंदाज अजित पवार यांनी लावला आहे.

हेही वाचा :- Live News ; शिवसेना मनसे समर्थकांमध्ये राडा

“लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्याने जगतापांना निवडून आणायचे आहे. पावसामधील सभेला होणारी गर्दी पाहून प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करायच ते करुद्या. परंतु आपण गाफिल रहायचे नाही. दरम्यान, अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत म्हणाले आहेत की, “बेट्या तुझी काय औकात आहे? तुझ्या १० पिढ्या यायला पाहिजेत राष्ट्रवादी संपवायला. तू कुणाशी पंगा घेतो. तुझी सगळी अंडी पिल मला माहित आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता शिवतारे यांच्यावर तोफ डागली. या मतदार संघात शिवसेनाचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपवर काही बोलत नाही, असे ते म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email