* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ढोलताशांच्या गजरात एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

ढोलताशांच्या गजरात एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

{म.विजय}

ठाणे दि.०४ :- ढोलताशांच्या गजरात, अपूर्व उत्साहात आणि शिवसैनिकांच्या जल्लोषात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे दीड तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीने किसननगर, वागळे इस्टेट परिसरात भगवा झंझावात निर्माण झाला होता. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’च्या डरकाळ्या आसमंतात घुमवत, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकनाथ शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने रवाना झाले. त्यांचे ठिकठिकाणी अपूर्व उत्साहात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शीख, मुस्लिम, गुजराती अशा सर्वच समुदायांनी शिंदे यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. किसननगर शाखा क्र. २ येथून सुरू झालेली मिरवणूक किसन नगर क्र. ३, श्रीनगर, शांती नगर, कैलास नगर मार्गे आयटीआय सर्कलपर्यंत आली. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे यांच्या समवेत, पिता, पत्नी, चिरंजीव खा. डॉ. श्रीकांत शिंदे व स्नुषा सौ. वृषाली शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा :- Kalyan ; रेल्वे रुळालगत सापडले ३६ लाखांचे मोबाइल

कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून २००४ साली ते पहिल्यांदा निवडणुकीत विजयी झाले, त्यावेळी ठाणे विधानसभा मतदारसंघ एकच होता. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघ स्वतंत्र झाल्यानंतर २००९ आणि २०१४च्या निवडणुकीत त्यांनी भरघोस मताधिक्यांनी विजय मिळवला. सन २०१४च्या विजयानंतर शिवसेना-भाजप महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली पाच वर्षे काम करताना त्यांनी ठाणे शहर व जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले, पण वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्यात प्रामुख्याने क्लस्टर विकास योजना, कोपरी पुलाचे रुंदीकरण, ठाणे मेट्रो, ठाणे पूर्व येथील सॅटिस, मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे विस्तारित स्थानक, जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय, ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण, बारवी प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन करून धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करून ठाणे

हेही वाचा :- आदित्य ठाकरे यांची डोंबिवली ठाकुरलीत प्रॉपरटी

शहरासह जिल्ह्याला वाढीव पाणीपुरवठा, कोळीवाडे-गावठाणांना सीआरझेडमधून दिलासा, जुन्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी इंसेंटिव्ह एफएसआय अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
ठाणे मेट्रो आणि कोपरी पुल रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून क्लस्टर योजनेतील पहिल्या प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामालाही प्रारंभ झाला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी प्रथमच ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली, तर जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकवला. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात शिवसेना-भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, निरंजन डावखरे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, महापौर मीनाक्षी शिंदे, भाजप शहरप्रमुख संदीप लेले, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदींसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *