अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी

*अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी*

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून राज्यातील एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळत आहे।

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टवर देखील छापेमारी सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रा राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना चर्चेत आली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर आज संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहे. त्याआधीच ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळतंय.

अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचं रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. या.सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परब यांचा पाय खोलात गेला आहे.

तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.