मुंबई ते पुणे महामार्गावर ई शिवनेरी बस धावणार – येत्या १ मे पासून सुरूवात,
मुंबई दि.२० :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसनंतर आता येत्या १मे पासून ई- शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. ही ई- शिवनेरी बस मुंबई -पुणे महामार्गावर धावणार आहे.
‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत दाखल तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा – मंगलप्रभात लोढा
सध्याच्या तिकिट दराच्या तुलनेत ई शिवनेरी बसचे तिकिट कमी असणार आहे. संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने तसेच प्रत्येक प्रवाशासाठी भ्रमणध्वनी चार्जिंगची सोय, सामान ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
बसची प्रवासी क्षमता ४३ इतकी असून वायफायसह मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच असणार आहे. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. मुंबई-पुणे शिवनेरीच तिकीट दर ७० ते १०० रुपयांनी कमी करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. ई-शिवनेरीच्या आठ गाड्या पुण्यात दाखल झाल्या असून मुंबईतल्या प्रादेशिक कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर या बसगाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.