शेती पंचनाम्यासाठीची ई-पीक पाहणी अट रद्द -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२६ :- राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे. विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी ई-पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.‌

हेही वाचा :- मुंबई आसपास संक्षिप्त

तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. यामुळे महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. मात्र असे असले तरी कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.