खाडी जवळील गणेश घाट झोपटपट्टीतील ३५ कुटुंबाची पावसा मुळे दैना

बालकृष्ण मोरे

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे चार दिवस उलटूनही दुर्लक्ष

कल्याण / कल्याणच्या खाडी किनारी असलेल्या गणेश घाट झोपडपट्टीची चार दिवस कोसळत असलेल्या पावसा मुळे दैना झाली आहे.येथील सर्व झोपड्या उध्वस्त झाल्या असून येथील लोक मंदिरात तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जागी आश्रयाला गेले आहेत. पण चार दिवस उलटूनही कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने या कुटुंबांची दखल घेतलेली नाही.

चार दिवस उलटून पाणी ओसरल्यावर या गणेश घाट झोपडपट्टीतील लोक आपल्या उध्वस्त झालेल्या झोपड्या कडे परतले आहेत, त्यांच्या घारातील वस्तू, बिछान्याचे तसेच खाण्या पिण्याच्या वस्तू पावसावच्या पाण्या मुळे उद्धस्त झाल्या असून शाळेत शिकणाऱ्या मुलांची दप्तरे, पुस्तके देखील शिल्लक उरलेली नाहीत.या गणेश घाट झोपडपट्टीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.या पसरलेल्या चिखलात आपले संसार उभे कसे करायचे हा मोठा प्रश्न या या गणेश घाट येथील झोपडपट्टीवासीयाना सातवीत आहे.

या गणेश घाट झोपडपट्टी बाबत तहसीलदार दीपक आकडे यांना फोन लावला असता ते मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात असल्याचे त्यांनी सांगितले.या बाबत येथील स्थानिक नगरसेवक वरून पाटील यांना फोन करून या गणेश घाट झोपडपट्टी बाबत सांगितले असता त्यांनी सांगितले की मी उद्या बघतो.या मुळे या झोपपट्टी कडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचेच दिसून आले. या घरदार उध्वस्त झालेल्या गणेश घाट झोपडपट्टीत भारत सोनार हे आपल्या कडील तुटपुंज्या पैश्यातून येथील झोपडपट्टी वासीयांची जेवनाची मदत करीत आहेत

अनेक लोकप्रिनिधी, समाज सेवकांनी पावसाच्या कमरे पर्यंतच्या पाण्यात उतरल्याचे व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केले आहेत.या पूरग्रस्तांना जेवण तसेच पाणी व इतर वस्तू वाटप करतानाचे फोटो, व्हिडीओ वायरल करण्यात आले आहेत, पण येथील गणेश घाट झोपडपट्टीत या जेवण, पाणी यांची गरज असताना येथे लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवक फिरकलेच नसल्याने येथील नागरिकांचा कोणी वाली नसल्याचेच दिसून येत आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की दर वर्षी येथे ही परिस्थिती उदभवते त्या मुळे शासन किंवा महापालिकेने आमचे पुनर्वसन करावे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email