कल्याण-भिवंडी मेट्रोमुळे वाहतूक कोंडी फुटेल

कल्याण दि. १९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कल्याण भेटीत मंगळवारी मराठीतून भाषणाची सुरुवात करत मेट्रो पाचचे भूमिपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या सगळ्यांना अभिवादन करत पंतप्रधान मोदी यांनी आपली भूमिका मांडली. कल्याण-ठाणे-भिवंडी या मेट्रोमुळे जोडले जाणार आहे. मेट्रो पाचमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचाही उल्लेख मोदींनी त्यांच्या भाषणात केला. मुंबईतील रेल्वेसाठी शेकडो कोटींचा निधी दिला. लवकरच पावणे तीनशे कीमी मेट्रोचे जाळे उभारणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.

हेही वाचा :- सिडकोची भव्य गृहनिर्माण योजना, ठाणे मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

मागील चार वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे पसरविण्यासाठी अनेक योजनांची सुरूवात आमच्याच सरकारने केली. मुंबईत 2006 मध्ये मेट्रोच्या पहिल्या योजनेची सुरुवात झाली. पण आठ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. हे प्रकरण कुठे अडकले ते सांगता येणार नाही. आमच्या आधीचे सरकार आठ वर्षात फक्त 11 किमीचा मार्गच का उभारू शकले? आणि ते कामही अपूर्णच कसे राहिले? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. मुंबई लोकलसाठी शेकडो कोटी रूपयांची तरतूद केली. इथल्या जुन्या रेल्वे पुलांचे नुतनीकरण करण्यात आले. मुंबई लोकलशिवाय वाहतुकीच्या इतर माध्यमांचाही विस्तार केला. ज्यात मेट्रो सिस्टीम हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या भाषणात त्यांनी मुंबईकरांचेही कौतुक केले. मुंबईकरांचे हृदय विशाल आहे आणि मुंबई हे देशाचे स्वप्न पूर्ण करणारी भूमी आहे असेही त्यांनी म्हटले. मेट्रो भूमिपूजनाच्यावेळी फडके मैदान येथील स्मशानभूमी सुरक्षितततेच्या दृष्टीकोनातून बंद केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावर आक्षेप घेत कल्याण येथे मनसे पदाधिकार्‍यांनी भाजप सरकार हाय हाय. अशा घोषणा देत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email