डोंबिवलीतील सागाव येथील लोकवस्तीतील डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी रहिवाश्यांचे आमरण उपोषण

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१२ – गेली ११ वर्ष डोंबिवली पूर्वेकडील सागाव येथील संजयनगर येथील लोकवस्तीतील मोकळ्या जागेवर पालिका प्रशासनाच्या घटांगाडी कचरा टाकत असल्याने डंपिंग ग्राउंड तयार झाले आहे. हे डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी सोमवारपासून रहिवाश्यांचे आमरण उपोषणास बसले आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप करत येथील रहिवाश्यांनी केला आहे. रहिवाश्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर स्थानिक नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांनी या रहिवाश्यांना पाठिबा दिला आहे. सागाव येथील संजयनगर भागात दररोज पालिकेच्या घटांगाडीतून कचरा टाकला जातो. याचा परिमाण येथील रहिवाश्यांच्या आरोग्यावर होत असून लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिका प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या पत्राला पालिका आयुक्तांनी केराची टोपली दाखविल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.येथील डंपिंग ग्राउंड हटवा नाहीतर उपोषणास बसू असा इशारा येथील रहिवाश्यांनी दिला होता.

हेही वाचा :- डोंबिवलीत सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण शंभर टक्के बंद होणार

सोमवारी गोगल प्रताप मंगे, नंदा भास्कर ढेकळे, सत्यकला देविदास गायकवाड,निर्मला सीताराम कुऱ्हाडे,प्रफुल्ल राम पाठारे,विनोद कचरू अडसूळ, लक्ष्मण गंगाराम चव्हाण, किशोर इल्लाले यासह अनेक रहिवाशी याच ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. सदर ठिकाणी इमारतीत घर घेताना विकासकाने ६ महिन्यात येथील डंपिंग ग्राउंड हटवून बागीचा तयार करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले.

उपोषणास बसलेले गोगल मंगे म्हणाले, अनेक वेळेला पालिका प्रशासन पाठपुरावा करून फक्त आश्वासन देतात.जोवर येथील डंपिंग ग्राउंड हटणार नाही तोवर आम्ही उपोषण सोडणार नाही. तर येथील ज्येष्ठ नागरिक गजाजन काशीद यांनी मी गेली २२ वर्ष येथे राहतो. काही वर्षापासून येथे कचरा टाकला जात आहे. आता येथे राहणे मुश्कील झाले आहे. हेडंपिंग ग्राउंड हटवावे आणि आम्हाला चांगल्या सुविधा मिळाव्या अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा :- नांदिवलीत १० हेक्टरमध्ये अद्ययावत वाहन चालक चाचणी पथ, संगणकीय वाहन तपासणी केंद्रे उभारणार

येथील स्थानिक नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांनी सदर ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्याची भेट घेतली. त्या म्हणाल्या. माझा या नागरिकांना पाठिंबा आहे.मी उपायुक्त धनाजी तोरस्कर यान संपर्क करून त्यांना रहिवाश्यांच्या हि समस्या सांगितली असता त्यांनी आम्ही काय करणार ? त्यांना उपोषणास बसायचे असल्यास बसू द्या असे उत्तरे दिली. पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद केले पाहिजे. २७ गावात ग्रामपंचायत असताना या ठिकाणी २७ गावांचा कचरा टाकला जायचा. मात्र २०१५ ला २७ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या ठिकाणचा कचरा पालिका प्रशासन आधारवाडी येथील डंपिंग ग्राउंड येथे टाकत आहे.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता येथील जागेत कचरा टाकला जाणार नाही आणि येथील डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email