कल्याणात मद्यपीचा रुग्णालयात धिंगाणा
डोंबिवली दि. ३१ – दारू पिऊन रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या चौघांनी डॉक्टरांशी वाद घालत त्यांना मारहाण केली. रुग्णलयातील एका महिलेला शिवीगाळ धक्काबुक्की केली. तसेच रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सदर पीडित तरुणीने उमेश धावरे, नितीन बनसोडे यांच्यासह त्यांच्या दोन मित्रा विरोधात कोळसेवाडी पोलोस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्वेकडील सूचक नगर येथील डॉ केदारनाथ सिंग यांच्या संजीवनी क्लिनिक मध्ये डोकटर रुग्णांना तपासत असताना क्लिनिक मध्ये नशेत असलेल्या उमेश धावरे आणि नितीन बनसोडे यांनी आपल्या दोन मित्रांसह प्रवेश केला.
हेही वाचा :- डोंबिवली ; बोलण्यात गुंतवून विद्यार्थ्यांची चैन लंपास
दोक्तराणी त्यातील एकाला तपासण्यासाठी बेड वर झोपण्यास संगीतले मात्र ऐकण्याच्याया मनस्थितीत नसलेल्या त्या नशेत असलेल्या चौघांनी आपण झोपणार नसून बसून तपास असे सांगत दोक्तराशी वाद घातला आणि काही वेळाने त्यांना मारहाण केली यामुळे रुग्णालयात धिंगाणा झाल्याने तपासणीसाठी रुग्णालयात रांगेत बसलेल्या रुग्णांनी निघून जाणे पसंत केली कल्याण पूर्वेकडील होमबाबा टेकडी परिसरात राहणारी तरुणी देखील या रुग्णालयातून उपचार न घेता घरी जात असताना या तोळक्याने तिला अडवून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तिने प्रतिकार करताच तिला अश्लील शिव्या देत तिचा विनयभंग केल्याची तक्रार घाबरलेल्या तरुणीने कोळशेवादी पोलीस ठाण्यात केली आहे.