अंमलीपदार्थ विरोधी कक्षाच्या कारवाईत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
मुंबई दि.०४ :- अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) मुंबईत राबविलेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी १४ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८४९ ग्रॅम एम. डी., १ किलो २३० ग्रॅम चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन, २८० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा सुमारे दोन कोटी ६० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश नहार यांची निवड
याशिवाय एएनसीने केलेल्या तीन कारवायांमध्ये २५ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले असून ई-सिगारेटच्या गोदामावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ई-सिगरेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. ट्रॉम्बे चिताकॅम्प परिसरात ई-सिगारेटचे गोदाम असून तेथे ई सिगारेटची विक्री, लिक्वीड फ्लेवर्सचा वापर करून ई सिगारेट पुन्हा रिफील करण्यात येतात. तसेच त्यांची बॅटरी पुन्हा रिअसेंबल करण्यात येत असल्याची माहिती एएनसीच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती.
एक्झिमा आणि बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण
या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ कलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या अन्य कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून ७७ ग्रॅम वजनाचे ‘एम. डी’ (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १५ लाख ४० हजार रुपये आहे.