ड्रोन व एअर मॉडेलची डोंबिवली जिमखान्यात अकादमी स्थापन करणार
डोबिवली दि.२३ – डोंबिवली जिमखाना सुरू होऊन तीन दशके झाली सध्याच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन जिमखान्यात लवकरच ड्रोन व एअर मॉडेल अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. तंत्र प्रेमी विद्यार्थाना याचा लाभ होणार आहे. डोंबिवली जिमखाना “सर्वांसाठी सर्वकाही “हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन गेली २२ वर्षे ‘उत्सव ‘आयोजित करत असून शनिवारी २२ तारखेला याचे उद्घाटन होणार आहे जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉ विश्वास पुराणिक यांनी केले आहे. २२ ते ३० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवामध्ये १५० स्टोल्स असून खवय्यांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे उत्सवाला भेट देण्यासाठी डोंबिवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात ,क्रिकेट ,पोहणे ,बेडमिंटन, फुटबॉल, आदी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन कार्यवाह महेंद्र मोकाशी यांनी केले.
हेही वाचा :- कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात दर मंगळवारी व चौथ्या शनिवारी पाणी पुरवठा 24 तास बंद
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉ श्रीकांत शिंदे ,आमदार सुभाष भोईर ,पत्रकार अशोक पानवलकर ,आदी २२ ता सायंकाळी होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून येणार असून ३० डिसेंबरला सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते समारोप करण्यात येणार आहे अशी माहिती मधुकर चक्रादेव यांनी दिली या दिवशी “खेलरत्न ” पुरस्कार सानिका अत्तरदे (इयत्ता 8 वी ,पाटकर स्कुल )हिला प्रदान करण्यात येणार आहे नेहमी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 लाख पासेस देण्यात आले आहेत डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने “उत्सव “ला भेट द्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे