सखी मतदान केंद्राबाहेर दिव्यांग मतदारांसाठी डोलीची सोय….

डोंबिवली दि.२९ – निवडणूक निर्णय आयोगाने यंदा दिव्यांगाची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्राबाहेर डोलीची सोय केली होती.डोंबिवली पूर्वेकडील स.वा.जोशी हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र असून मतदान केंद्राबाहेर दिव्यांग मतदारांसाठी डोलीची सोय करण्यात आल्याने दिव्यांग मतदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.तर सखी मतदान केंद्राबाहेर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदाराला कर्मचारी गुलाबाचे फुल देऊन आभार मानत होते.झोनल अधिकारी रोहिणी लोकरे यांसह महिला कर्मचाऱ्यांनी उत्तम काम सांभाळले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email