‘शिष्ट भारत अभियानाला’ डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ

नवी दिल्ली, दि.२२ – आपल्या आचरणातून मोठ्या माणसांनी युवा पिढीसमोर आदर्श घालून दिला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे. एका बिगर सरकारी संस्थेने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘शिष्ट भारत अभियान’ शुभारंभ कार्यक्रमात ते आज बोलत होते.

हेही वाचा :- ‘डिजिटल भारत, सक्षम भारत’चे प्रकाशन

ज्येष्ठ पिढीचे आचरण पाहून युवा पिढी नैसर्गिकरित्या मूल्ये आत्मसात करत असते. त्यामुळे मोठ्यांनी सजग होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली स्वच्छ भारत अभियान लोकचळवळ झाली. पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे लोकांमध्ये वर्तनात्मक सुधारणा झाल्याचे सिंह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.