स्टार्ट अप उपक्रमासंदर्भात डीपीआयआयटीकडून राज्य क्रमवारीसाठी सुरुवात

स्टार्ट अप क्रमवारी 2018 च्या यशानंतर इंटरनेट व्यापार आणि उद्योग चालना विभागाने (डीपीआयआयटी )दुसऱ्या वर्षासाठीच्या राज्य क्रमवारीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी यात 27 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. स्टार्ट अप क्रमवारी आराखड्याचा उद्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्ट अप्सना पोषक परिसंस्था निर्माण व्हावी, एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान व्हावे हा आहे. हा आराखडा राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :- ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ

2019 च्या क्रमवारी आराखड्यामध्ये 9 स्तंभ आणि 30 कृती बिंदूंचा समावेश आहे. संस्थात्मक साहाय्य, सुगम नियमन, जागरूकता, भांडवली पाठिंबा यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या प्रयत्नांचे परीक्षण याअंतर्गत केले जाईल. परीक्षणांतर्गत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी 1 मे 2018 ते 30 जून 2019 या कालावधीत योजलेल्या उपायांचे मूल्यांकन केले जाईल. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना आपल्या सुधारणा www.startupindia.gov.in या संकेतस्थळावरील राज्य स्टार्ट अप क्रमवारी डॅशबोर्डवर पाठवाव्या लागतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email