कलयुगात दुस:याचे कौतुक करणारे कार्यक्रम होतील की नाही याबाबत साशंकता- अरूंधती भालेराव

माणूस जोडणे ही अत्यंत अवघड कला मेहता परिवाराकडे आहे. पुढच्या काळात अशी माणसे दिसतील की नाही यात शंका आहे. कलयुगात प्रत्येक माणूस स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या भोवती प्रत्येक जण फिरत आहे. या पुढील काळात दुस:याचे कौतुक करणारे कार्यक्रम होतील की नाही याबाबत सांशकता आहे असे मत निवेदक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अरूंधती भालेराव यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीतील ‘मेहता मित्र मंडळा’च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी माधवाश्रम सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. अरूधंती भालेराव बोलत होत्या. कै. कैलासभाई मेहता पुरस्कार रांगोळीकार विनायक वाघ तर कै. पुष्पलता मेहता पुरस्कार कीर्तनकार ज्योत्सना गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. यंदाचे पुरस्काराचे 23 वे वर्ष होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
भालेराव म्हणाल्या, डोंबिवलीत अनेक हिरे आहेत. त्यांच्या गुणांचे कौतुक करण्याचे काम या पुरस्कारांच्या रूपाने होत आहे. फेसबुक म्हणजे मला डोकेदुखी वाटते. पण या फेसबुकमुळे माझी आणि मेहता परिवाराची ओळख झाली. फेसबुक हे दोन माणसांना जोडणारे माध्यम ठरू शकते याच उदाहरण म्हणजे मेहता परिवाराशी झालेली ओळख आहे. माझी वेबसाईट आणि फेसबुक विद्यार्थीनी अपडेट करतात. मेहता यांची फेण्ड्स रिक्वेस्ट स्वीकारली त्यानंतर परिचय झाला आणि इतकी वर्ष आपली मैत्री का नव्हती या गोष्टीचे वाईट वाटले. समाजातील विविध क्षेत्रतील व्यक्तीचे गुण हेरून त्यांचा सत्कारकरण्यासाठी विशाल हदय लागते. निस्वार्थीपणे हा कार्यक्रम केला जात आहे. एखादी संस्था चालविणो ती चालविताना लोकांचे मूड्स सांभाळणे ही अवघड गोष्ट आहे. माणूसपणा जपणे यामुळेच आजच्या या कार्यक्रमाला जमलेली मंडळी आवुजर्न उपस्थित आहेत. आजच्या घडीला प्रत्येक माणसं प्रेम करणारी मिळविणे खूप मोठी गोष्ट आहे. मेहता परिवार स्वहित जाणताना परहित जाणतात ही कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे, असे ही त्यांनी सांगितले.
विवेक पंडित म्हणाले, या पुरस्कार सोहळ्य़ाची प्रथा 23 वर्षापासून सुरू आहे. या प्रक्रियेत मी कधी ओढला गेलो मला समजलेच नाही. किर्तन हे समाज प्रबोधनासाठी आवश्यक आहे. ही कला पुर्नजिंवित होत आहे. कीर्तन कलेची आठवण या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे. डोंबिवलीत कलाकारांची कमतरता नाही. त्यामुळे डोंबिवली जे काही सुरू आहे त्या सर्वाची मेहता खबर ठेवत आहे. त्या कलाकारांचे पुरस्कारांच्या रूपाने कौतुक ही करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
विनायक वाघ म्हणाले, हा पुरस्कार कलेच्या सेवकाला प्रदान केला आहे. बिंदू जोडून पाच बोटांनी काम कसे करावे हे संस्कारभारतीने शिकविले आहे. रांगोळी हे खरेतर महिलांचे क्षेत्र आहे असे मानले जात होते पण आता पुरूष देखील या क्षेत्रत येत आहेत. नवीन कलाकार सुध्दा या क्षेत्रत येत असल्याने नवीन नवीन प्रकार येत आहे. पूर्वी ही कला शिकली आहे त्यांना आता यात नवीन शिकण्यासारखे काही नाही असे म्हणता येणार नाही. नवीन नवीन प्रकार यात येत असल्याने हेच आमच्या कलाकारांचे यश आहे असे म्हणावे लागेल. प्रत्येक कलाकार हा सहा तास बसून काम करीत असतो तेव्हा त्यांनी आपल्या शारीरीक काळजी घ्यावी असा सल्ला ही त्यांनी दिला.
ज्योत्सना गाडगीळ म्हणाल्या, या पुरस्कार प्राप्त व्यक्तीची यादी वाचल्यावर आपले योगदान काहीच नाही असे वाटू लागले. हा पुरस्कार म्हणजे समाजाप्रती एक चांगले काम करण्यास सुरूवात करा असे सांगत आहे. या पुरस्काराने जशी कौतुकाची थाप दिली आहे तशीच चांगले काम करण्याची जबाबदारीही टाकली आहे. कलेची कदर करावी हा संस्कार या मेहता परिवाराने घालून दिला आहे असे त्यांनी सांगितले. तर सुधीर जोगळेकर यांनी मनोजच्या व माझ्या मैत्रीला २०२० या वर्षी मैत्रीचा सुवर्णमहोत्सव होणार आहे असे सांगून धमाल उडवली व ती नक्की वेगळ्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ सोहोनी आणि अप्रतिम सूत्रसंचालन जान्हवी विंझे यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email