वीज मनोरे आणि वीज वाहिन्यांच्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय 

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे वीज मनोरे आणि वीज वाहिन्यांसाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हा मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. मात्र, हा मोबदला कमी असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातून वीज वाहिनी टाकण्यास किंवा मनोरा उभारण्यास विरोध करतात.

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार त्यांच्या कायम नोकरी व प्रलंबितबाबतीत महाराष्ट्रात डिसेंबर 22 ला करणार आंदोलन

त्यामुळे पारेषण कंपन्यांचे विविध प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल, असे सांगितले जाते.

प्रा. वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ पुरस्कार जाहीर

हे धोरण संबंधित शासन निर्णय जाहीर झाल्यापासून काम सुरू असलेल्या आणि नवीन प्रस्तावित अशा सर्व अति उच्चदाब पारेषण वाहिनी प्रकल्पांसाठी लागू असणार आहे.

हलाल सक्ती विरोधी परिषदेत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण !

मोबदला निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेणार आहे.
——–

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.