डोंबिवलीतील म्हसोबा चौकाजवळ दुचास्की चे अनधिकृत पार्किंग होत असल्याने त्यामुळे अपघात होण्याची भीती
डोंबिवली दि.२१ – कल्याण डोंबिवली 90 फुटी समांतर रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही टोकाला वाहतूक कोंडी होत आहे. डोंबिवलीतील म्हसोबा चौकाजवळ दुचास्की चे अनधिकृत पार्किंग होत असल्याने त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. सदर अनधिकृत दुचाकी पार्किंग बंद करावे असे पत्र पालिकेने वाहतूक पोलिसांना पाठवले आहे. समांतर रस्त्यावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी म्हसोबा चौकात दुचाकी वाहन चालक वेडेवाकडे पार्किंग करत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
हेही वाचा :- १ डिसेंबरला डोंबिवलीत तिरुपती बालाजी दर्शन सोहळ्याचे आयोजन
यामुळे अपघात होण्याची भीती असून ते त्वरित बंद करावे असे पत्र डोंबिवलीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी वाहतूक विभाग डोंबिवली यांना पाठवले आहे येथे पार्किंग साठी कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे. त्याच प्रमाणे 2 की मी लांबीच्या 90 फुटी रस्त्यावर पत्री पुलाजवळ जोडणारा 100 मीटर लांबीचा रस्ता वादात अडकल्याने तेथेही वाहतूक कोंडी होत आहे 90 फुटी रस्त्यावरील वाहतूक वेगाने व्हावी नागरिकांचा वेळ वाचावा हा उद्देश यामुळे सफल होत नाही ही जागा टी डी आर मिळावा म्हणून वादात सापडली असून प्रशासन या कडे लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे 90 फुटी रस्त्याच्या दोन्ही टोकाला वाहन कोंडी होत असल्याने व प्रशासन हा प्रश्न सोडवण्यास कमी पडत असल्याने नागरिकांनी नाराजी दर्शवली म्हसोबा चौक व पत्री पूल या दोन टोकांना होणारी वाहतूक कोंडी लवकर सोडवा अशी मागणी नागरिक करत आहेत.