डोंबिवलीत भरदिवसा घरफोडी

डोंबिवली दि.२० – डोंबिवली पूर्व नांदिवली टेकडी शांतीसदन इमारती मध्ये राहणाऱ्या सुश्मिता गुप्ता या सकाळी कामानिमित घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या घरचे कुलूप तोडून घरातील ३५ हजारांची रोकड चोरून नेली सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; बहिणीशी ओळख वाढवू नकोस सांगणाऱ्या भावाला बेदम मारहाण

दुसरी घटना मानपाडा रोड पिंपळेश्वर दर्शन बिल्डींग मध्ये घडली आहे .या इमारती मध्ये राहणारे दिनेश जाधव सोमवारी सकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले घराल कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्यचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email