डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.११ – डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव श्रीकृपा चाळीत राहणारे देवेंद्र तानिवडे हे काल दुपारी घराला कुलूप लावून कामामिनित्त बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरच्य किचन च्या खिडकीचे स्लायडिंग उचकटून घरात घुसून घरातील सोन्य चांदीचे दागिने व रोकड असा मिळून एकूण सुमारे १३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री साडे नऊ च्या सुमारास घरात परतल्या नंतर त्याना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- नांदिवलीत १० हेक्टरमध्ये अद्ययावत वाहन चालक चाचणी पथ, संगणकीय वाहन तपासणी केंद्रे उभारणार
Please follow and like us: