डोंबिवलीकर शेफचा विश्वविक्रम २५ हजार बटाटावाड्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

कल्याण दि.३१ :- डोंबिवलीत आयोजित एका फेस्टिवलमध्ये डोंबिवलीकर असलेले शेफ सत्येंद्र जोग यांनी विश्वविक्रमी बटाटावडा हा लक्षवेधी उपक्रम हाती घेतला. आपल्या 100 सहकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी सकाळ बटाटेवडे तळण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत जोग यांनी 25 हजार बटाटेवडे तळून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद केली. मराठमोळ्या बटाटावडा या पदार्थाला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त व्हावा आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी शनिवारी एक दिवसात 25 हजार बटाटेवडे तळण्याचा मानस यावेळी शेफ सत्येंद्र जोग यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :- Dombivali ; सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत भुताटकीचा फेरा

त्यासाठी 1500 किलो बटाटे, 500 किलो गोडेतेल असा एकंदरीत 2500 किलो साहित्य वापरून हे बटाटे वडे तळले. हे बटाटेवडे तळ्यासाठी 4 मोठ्या कढया वापरण्यात आल्या. एका कढईत सांधारणात: 50 ते 100 बटाटेवडे तळले जात होते. तर आपण पहिल्यांदाच हा विश्वविक्रमी बटाटावडा उपक्रम करीत असल्याचे शेफ जोग यांनी बोलताना सांगितले. हा उपक्रम सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता. दुपारी अडीच वाजेपर्यत 10 हजार बटाटेवडे तळून झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :- सरकार आणि सहकारापेक्षा संस्कार महत्वाचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

डोंबिवलीचा बटाटा वडा आणि सत्येंद्र जोग यांची ओळख संपूर्ण जगभर व्हावी, अशी आशा आयोजक राहुल कामात यांनी व्यक्त केली. विश्वविक्रमी तळलेले हे बटाटेवडे तळून पूर्ण केले. हे तळलेले बटाटेवडे गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि संस्थांना मोफत वाटण्यात येणार आहेत. यामध्ये वीटभट्टीवर काम करणारी मजूर, रस्त्यावर राहणारे विद्यार्थी, आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थी आणि गरजूंना हे बटाटेवडे मोफत वाटण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजकांनी शेफ सत्येंद्र जोग यांचे आभार मानले. याच दरम्यान, चविष्ट आणि चवदार बटाटे वडे खाण्यासाठी डोंबिकरांना पर्वणी लाभली असल्याचे मत वडा खाणाऱ्या एका खवय्याने व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email