डोंबिवलीत `विजय दिनी` शिवसेनेने वाहिली शहीद जवानांना आदरांजली

डोंबिवली दि.१६ – आजच्या दिवशी पाकिस्तानशी `१३ दिवसांचे युद्ध` हिंदुस्तानी फौजांनी लढून निर्णायक विजय मिळवून मिळवला होता. ह्या विजयाचा ४७ वा विजय दिनी डोंबिवली येथील कॅप्टन विजयकुमार सचान स्मारक येथे शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान व विद्यानिकेतन यांनी या प्रसंगी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. आजच्या दिवशी पाकिस्तानी सेनेच्या ९० हजारांच्या वर सैनिकांनी हिंदुस्तान पुढे ढाका येथे शरणागती पत्करली. हे युध्य पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुशल राजकीय डावपेच व फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या अद्वितीय युद्ध कौशल्यामुळे लष्करी इतिहासात अजरामर झाले आहे. या युद्धात अतुलनीय शौर्य साठी ४ परमवीर चक्र अनुक्रमे लांस नायक अल्बर्ट एक्का, फ्लायींग ऑफिसर निर्मल जित सिंग शेखावत, लेफ्टनंट अरुण खेत्रपाल व मेजर होशियार सिंग यांना प्रदान करण्यात आली.

हेही वाचा :- भारतात मधुमेहापाठोपाठ कॅन्सरग्रस्त रुग्णांत वाढ – डॉ.अनिल हेरूर

पाकिस्तानी पाणबुडीने आपल्या आय एन एस खुकरी युद्ध नौकेचा वेध घेतला असता त्याचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांनी अत्यंत धीरोदात्त पणें जलसमाधी घेणे पसंत केले, त्यांना या त्यागासाठी महावीर चक्र देवून सन्मानित करण्यात आले तर लोंगेवाला पोस्ट वर पूर्ण पाकिस्तानी रणगाडा रेजिमेंटला रोखून धरल्या बद्दल मेजर कुलदीप सिंग चांदिपुरी यांना ही महावीर चक्र देवून सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख व शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, शिवसंकृतीचे ललित शाईवाले व प्रोफेसर निषाद पवार, शिवसेना रिक्षा युनियनचे सुदाम जाधव, अशोक पगारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email