डोंबिवली ; रंगकर्मीच्या वेशभूषेत मनसेचे पालिका मुख्यालयात अनोखे आंदोलन…

डोंबिवली दि.२९ – डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या ४ महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद आहे. यामुळे नागरिकांसह नाट्यरसिकांचा हिरमोड झाला असून रंगमंदिर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणी साठी मनसेने अनोखे आंदोलन छेडले. कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाचा मनसेकडून आगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नटसम्राट, लखोबा लोखंडे, काशिनाथ घाणेकर, अलबत्या गलबत्या चेटकीण, भीम,चिमणराव या वेशभूषेत रंगकर्मी म्हणून मनसे कार्यकर्ते मुख्यालयात आले. यावेळी मनसेने शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत नाट्यगृह लवकरात लवकर सूरु करण्याची मागणी केली. पालिकेच्या डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बिघडल्याने ८ सप्टेबर २०१८ पासून हे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते.

हेही वाचा :- शांततामय उद्देशांसाठी बाह्य अंतराळ शोध आणि उपयोग

यावेळी तीन महिन्याच्या कालावधीत नाट्यगृह संपूर्ण दुरुस्तीसह सुरु करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात नाट्यगृह बंद होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरु झालेले नाही. डिसेम्बर जानेवारी महिन्यात डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले रंगमंदीराला मोठी मागणी असताना हे नाट्यगृह याच कालावधीत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने संस्थाचा हिरमोड झाला आहे. नाट्यगृहहातील वातानुकुलीत यंत्रणा बदलण्यासाठी संबधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली असली तरी या ठेकेदाराचा पूर्वेइतिहास पाहता संबधित ठेकेदाराला आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याच्याकडून वापरल्या जाणारया साहित्याचा दर्जा तपासून कामास प्रारंभ केला जाईल, यात आणखी आठ ते दहा दिवस जाण्याची शक्यता वर्तवली जात असून कलाकारासह प्रेक्षकांना सावित्रीबाई रंगमंदिराचा पडदा उघडण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा :- पंतप्रधान अंदमान आणि निकोबार बेटांचा दौरा करणार

गेली चार महिन्यांपासून सावित्रीबाई नाट्यगृह बंद असल्याने मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, गटनेता मंदार हळबे, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा अध्यक्ष सुदेश चुडनाईक, विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, दीपक शिंदे, राजू पाटील, सचिन कस्तूर, समीर करंबळकर, प्रथमेश खरात, केतन सावंत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पालिका मुख्यलयात आले. गेल्या ४ महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असणारे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह लवकर सुरू करावे या मागणीसाठी यावेळी मनसेत आंदोलन केले. रंगमंचावरील अनेक सुप्रसिद्ध पात्रांच्या वेशभूषेतील रंगकर्मींनी महापालिकेवर धडक दिली. दुरुस्तीचे कारण देत गेल्या सप्टेंबर महिन्यापसून महापालिका प्रशासनाने हे नाट्यगृह बंद केले आहे. त्यामूळे नाट्यकर्मींची मोठी कुचंबणा होत आहे. मात्र बंद करूनही त्यामध्ये अजिबात कोणतीही दुरुस्तीच सुरू नसल्याचे यावेळी मनसेतर्फे सांगण्यात आले. प्रशासनाच्या या वेळकाढूपणाचा निषेध करण्यासाठी मनसेतर्फे आज हे अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. तसेच या नाटकातील अभिनयाप्रमाणे संवादफेक करीत महापालिका प्रशासनाकडे नाट्यगृह सुरू करण्याची मागणी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email