डोंबिवली ; एकाच फॅनला गळफास लावून दोघा मैत्रिणींची आत्महत्या

डोंबिवली दि.०२ – एकाच सिलिंग फॅनला दोघा मैत्रिणींनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली जवळच्या कोळेगावात मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र एकाच वेळी दोन मैत्रिणींनी एकत्र आत्महत्या केल्याची डोंबिवली परिसरातील पहिलीच घटना मानली जाते. ऋतुजा साहेबराव कोल्हे (१४ ) आणि वर्षा चिंतामण पाटील (२७ ) असे आत्महत्या करणाऱ्या मैत्रिणींची नावे आहेत.

हेही वाचा :- डोंबिवली ; खांबाळपाडा येथील बेकायदा दुकानांच्या शेडवर महापालिकेची कारवाई

बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावात श्री समर्थकृपा इमारतीत चिंतामण पाटील राहतात. त्यांची मुलगी वर्षा हिच्याकडे ऋतुजा ही नेहमी झोपायला येत असे. नेहमीप्रमाणे ऋतुजा आणि तिचा भाऊ सोमवारी रात्री वर्षाच्या घरी झोपले. पहाटे पाच वाजता ऋतुजाच्या भावाला जाग आली. तेव्हा स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला ऋतुजा आणि वर्षा या दोघींचा मृतदेह एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. या दोन्ही मैत्रिणींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मानपाडा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email