डोंबिवली रेल्वे अपघातात आठ महिन्यात झाले 99 बळी

डोंबिवली दि.१३ :- डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत सोमवारी रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर अनुज विरेंद्र विश्वकर्मा (18) नावाचा तरुण अज्ञात गाडीच्या धडकेत मध्यरात्री मरण पावला. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत जानेवारी 2019 पासून एकूण 99 जणांचे बळी गेले आहेत. विश्वकर्मा हा नांदिवली येथे रहाणारा असून रविवारी रात्री साडेबाराचे सुमारास तो अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरुन क्रॉस करत असताना अज्ञात ट्रेनच्या धडकेत ते जखमी झाला. शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत वसई, जुचंद्र, कोपर, भिवंडी, बापगाव, कामण, डोंबिवली ठाकुर्ली व अप्पर कोपर अशी रेल्वे स्थानके असून.

हेही वाचा :- चेंजिंग रूममध्ये चित्रीकरण; मालक व नाेकर अटकेत

पोलीसांना सुविधा मिळत नसल्याने जखमी प्रवाशाला आणण्यासाठी स्ट्रेचर, रुग्णवाहिका, हमाल आदिंची सोय नाही. सोमवारी रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात तरुण जखमी झाल्यानंतर त्याला तेथेून आणण्यासाठी हमाल मिळत नाही. इतर सुविधा नाही तसेच दिवा वसई मार्गावर मर्यादित ट्रेन धावत असल्याने रेल्वे पोलीसाना जखमी प्रवाशाला आणण्यासाठी पायपीट करावी लागते. या मार्गावर वेळेवर उपचार मिळाले तर प्रवाशांचे प्राण वाचू शकतील. मात्र त्याच मिळत नसल्याने अपघातात बळींची सख्या वाढत आहे. या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश पवार यंाना विचारले असता त्यानी लोहमार्ग पोलीस आपले काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगीतले व त्या त्रुटी आहेत त्या वरिष्ठांपर्यत कळवल्या असल्याचे सांगीतले.

पिशाब करने के लिए लोकल ट्रेन के ड्राइवर ने पूरी ट्रेन रोक दी, Central Railway, Mumbai –
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email