डोंबिवली ; राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात चोरी
डोंबिवली दि.१८ – कल्याण डोंबिवली शहरात चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून सरकारी कार्यालयांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. कल्याण पश्चिमेकडील कर्णिक रोड वरील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूम मधून काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या विभागाने जप्त केलेला गावठी दारू बनवण्याकरीता वापरण्यात येणारे सतेले चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आता या कार्यालयाच्या सुरक्षिततेच प्रश्न ऐरणीवर आला आहे .
कल्याण पश्चिम कर्णिक रोड येथे राज्य उत्पादन शुल्क विभगाचे कार्यालाय आहे या कार्यलयाच्या मागील बाजूस कार्यालयाचा स्टोअर रूम असून रविवारी सायंकाळच्या सुमारस कार्यलयातील कर्मचारी कार्यलय बंद करून घरी निघून गेले. या संधी चा फायदा घेत अज्ञात चोरट्याने स्टोअर रूमला लावण्यात आलेले कुलूप तोडून या रूम मध्ये ठेवलेले या विभागाने जप्त केलेला गावठी दारू बनवण्याकरीता वापरण्यात येणारे सतेले चोरून नेले आहेत. काल सकाळी कार्यलयात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.