डोंबिवलीची नसबंदी…. व्हाट्सअप ग्रुप वरुण साभार

एखादे शहर अधोगतीकडून विकासकडे वाटचाल करते, शहराची प्रगती होत असते,..शहर जसे वाढते तशी विकास कामे सुध्दा वाढत असतात, पण डोंबिवलीची गोष्ट वेगळी आहे, येथील डोंबिवली शहरावर ज्यांची गेले २५-३० वर्ष सत्ता गाजवली त्या शिवसेना भाजपाने डोंबिवली शहराची व डोंबिवलीच्या विकासाची मात्र नसबंदी केली आहे..डोंबिवलीत एक तरी असे झालेले किंवा सुरू असलेले विकास काम, प्रकल्पाचे काम दाखवावे जे सुरळीत सुरू आहे…
आता त्यात भरीस भर म्हणुन की काय डोंबिवली पश्चिमेला डोंबिवली पूर्वेशी जोडणार महत्वाचा पूलंच बंद होतोय म्हणे, वाहतूकीला तो धोकादायक झालाय असा अहवाल आलाय म्हणुन त्वरीत बंद करायचाय म्हणे, म्हणजे डोंबिवलीकरांनी बोंबलायचेच आहे…ह्या पूर्वी देखील अनेक पत्रकारांनी, जागृत डोंबिवलीकरांनी ह्या पुलाच्या धोकादायक वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले होतेच की..? मग क्लीन चीट कोणी दिली..? का दुर्लक्ष केले..? आता एेन पावसाळा तोंडावर आला असताना कशी होणार कामे…? का डोंबिवलीकरांना राम भरोसे ठेवणार..? कारण इतिहास साक्षी आहे, विकासशुन्य कामातून डोंबिवलीची नसबंदी केलेली आहे ….ते खालील प्रमाणे

१. डोंबिवली कल्याणला (तालुक्याला जोडणारा) पत्रीपूल बंद
२. सावित्रीबाई फुले नाट्य गृह बंद
३. डोंबिवली वाशी, डोंबिवली पनवेल, डोंबिवली पुणे डोंबिवली पश्चिम बस सेवा बंद
४. केडीएमटी डोंबिवली करीता असलेला खंबाळपाडा बस डेपो बंद
५. डोंबिवली सुतिकागृह बंद
६. डोंबिवली उपायुक्त केबिन बंद

७. डोंबिवली भाजी मंडया बंद
८. डोंबिवली-कल्याण-ठाणे-तळोजा मेट्रो काम बंद
९. डोंबिवली-शीळ रस्ता रुंदीकरण काम संथ
१०. डोंबिवली- शिळफाटा वाहतुक कोंडीला कारणीभूत असलेल्या जंक्शनवरील नविन पूलांची कामे बंद (मुळात ती सुरूच नाही होत)
११. डोंबिवली-मानकोली रेतीबंदर खाडीपूल काम बंद
१२. साप चावला तर त्यावरील लस बंद
१३. डोंबिवली प्रदुषणाला कारणीभूत रासायणीक कंपण्याच्या स्थलातराच्या व केमिकल कंपनीतील स्फोटातील नुकसान भरपाईच्या फाईल बंद
१४. डोंबिवली एमआयडीसी रस्ता दुरूस्तीची कामे हद्द वादामुळे बंद
१५. रिक्षा मिटरनुसार चालाव्या पण मिटर बंद
डोंबिवलीच्या विकासाची व डोंबिवलीला सुनियोजित शहरात रूपांतर करणारी सर्व विकासकामे ह्या सत्ताधारी शिवसेना-भाजपा सत्ताधाऱ्यांनी बंद ठेवली आहेत किंवा सुरूच केली नाही..त्यामुळे शिवसेना भाजपा पक्षा कडे व त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून डोंबिवलीच्या विकासाचे कुठलेच ध्येय धोरण नसल्यामुळे एकप्रकारे डोंबिबिवली शहराची नसबंदीच ह्यांनी केल्याची दिसुन येते…

डोंबिवलीकर तुझी व तुझ्या बरोबर तुझ्या शहराची वाढ खुंटली, ह्यांच्या मुळेच खुंटली…तु मात्र वाहतुक कोंडीत अडकून रहा, रेल्वेच्या गर्दीतून हात सटकून तर कधी कंपनीच्या स्फोटातील अपघातात तू मरतच रहा…तुझा विकास होणारच नाही, कारण डोंबिवलीची तर नसबंदी झाली आहे…

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email