डोंबिवली ; बाईक रेसिंग साठी ते चार तरुण करायचे बाईक चोरी

डोंबिवली दि.२२ – डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या चार तरुणांना मानपाडा पोलिसांनी पकडले आहे. चार पैकी तीन अल्पवयीन असल्यामुळे तिघांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त बाईक रेसिंग साठी बाईक या बाईक चोरी करत होते. बाईक चोरी करणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर डोंबिवली मध्ये एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात बाईक चोरीच्या प्रकार अचानक वाढले होते. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस स्टेशन चे पोलीस आपल्या हद्दीतील सोनारपाडा परिसरात रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत होते.

हेही वाचा :- मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारे मनसे नेते नितीन नांदगावकरांना नोटीस मुंबईतून दोन वर्षांसाठी तडीपार करू!

रात्री दोन च्या सुमारास रस्त्याच्या एका बाजूला दोन बाईक वर चार तरुण दिसले पोलिसांनी चौघांची विचारपूस केली. मात्र कोणत्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर न मिळाल्या मुळे चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सखोल चौकशी नंतर या तरुणानी कबुली दिली कि ते बाईक चोरीसाठी रात्री उभे होते. या चौघांनी आतापर्यंत ७ बाईक चोरी केल्या आहेत. ४ पैकी ३ अल्पवयीन असल्याने कोर्टाने तिघांची रवानगी बालसुधार गृहात केली आहे आणि एक आरोपी गयसुद्दिन खान याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे तरुण फक्त आणि फक्त बाईक रेसिंग साठी बाईक चोरीचा प्रकार करत होते.त्यांच्याकडून पोलिसांनी ७ बाईक हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email