डोंबिवली ; मानसिक छळ करणाऱ्या विकृत तरुणाचे महिलेने कापले लिंग

कल्याण दि.२६ – महिलेशी वारंवार अंगलट करण्याचा प्रयत्न करत छेड काढणाऱ्या तरुणाला वारांवर समज देऊनही त्याने छेड काढणे सुरूच ठेवल्याने संतप्त महिलेने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तरुणाचे लिंग कापल्याची धक्का दायक घटना डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली टेकडी परिसरात घडली. मंगळवारी ८ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ३० वर्षीय तरुण तुषार पुजारी याला डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिचे दोन साथीदार प्रतिक कनोजिया आणि तेजस म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली टेकडी परिसरात तुषार पुजारी आणि सदर महिला शेजारी शेजारी राहतात. सद महिला विवाहित असून तुषार तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.

हेही वाचा :- डोंबिवलीत ; सनकी डॉक्टर पतीचा बोगस सर्टिफिकेटच्या वादातून पत्नीवर चाकूने हल्ला

याच एकतर्फी प्रेमातून तो तिला मानसिक त्रास द्यायचा. तुषारच्या सातत्याने होणाऱ्या जाचामुळे सदर महिला घाबरली होती. त्यातच तुषार ने दोन दिवसापूर्वी या महिलेच्या पतीला मी तुमच्या पत्नीवर प्रेम करतो असे सांगितले होते. त्यामुळे महिला आणि तिच्या पती मध्ये भांडण सुरू झाले होते. या घडल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी सदर महिलेने काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तुषार ला नांदीवली टेकडी येथील एका मैदानात बोलावले यावेळी महिलेसोबत तिचे दोन साथीदार कनोजिया आणि म्हात्रे होते. त्यांनी तुषार ला जाब विचारत बेदम मारहाण केली इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात तुषारचे लिंग कापून टाकले. या घटनेत तुषार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचार साठी डोंबिवली मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात सदर महिलेसह तिचे दोन साथीदार प्रतिक कनोजिया आणि तेजस म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email