डोंबिवलीत सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण शंभर टक्के बंद होणार

डोंबिवली दि.१० – प्रदुषणामुळे औद्योगिक विभागातील ८६ कंपन्या वर्षभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. सांडपाणी उदंचन केंद्रावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याचा धडा घेऊन सांडपाणी प्रदुषण केंद्राने कात टाकली आहे. आता डोंबिवली औद्योगिक विकास मंडळानेही उदंचन केंद्र ते ठाकुर्ली खाडी पर्यतचे सुमारे ८ किमी अंतर बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचे ठरवले असून १०१ केाटी रुपयांचे कंत्राट कोमॅको कंपनीला दिले आहे. यामुळे सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण शंभर टक्के बंद होणार आहे. दोन महिन्यापूर्वी फेज दोन मधील सामूहिक प्रक्रिया केंद्राच्या कार्यालयाचे व तांत्रिक प्रक्रिया केद्राचे उदघाटन प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रदेशिक अधिकारी धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले होते. डोंबिवलीतील उद्योजक प्रदुषित सांडपाणी नाल्यातून सोडत असल्याने डोंबिवलीकरांना प्रदुषणाचा प्रचंड त्रास होत होता.

हेही वाचा :- `एक घर एक खेळाडू` रिजेंसी संकुलाची संकल्पना….

म्हणून प्रदुषण नियंत्रण मंडळाने उदंचन केंद्र ते ठाकुर्ली मुंब्र खाडी हे आठ किमी अंतरावर पाईप लाईन टाकण्याचे ठरवले व बंदिस्त पाईप मधून प्रदुषित पाणी थेट खाडीत सोडण्यात येणार असल्याने डोंबिवलीचे जलप्रदुषण शभर टक्के कमी होण्यास मदत होणार आहे या कामासाठी सुमारे १०१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तीन वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उदंचन केंद्रात उद्योजकांना २५ टक्के प्रदुषित सांडपाणी सोडण्याची परवानगी असून लवकरच त्याना १०० टकके पाणी सेाडण्याची परवानगी मिळेल असा विश्वास उद्योजक व्यक्त करत आहेत. डोंबिवली औद्योगिक विकास मंडळात नुकतेच या कामाचे टेंडर उघडण्यात आले व कोमॅको कंपनीचे टेंडर मंजूर करण्यात आले असे एका अधिकार्याने सांगीतले. उदचंन केंद्राचे आधुनिकीकरण व सांडपाणी थेट बंदिस्त पाईपमार्फत खाडीत सोडण्याच्या निर्णयामुळे डोंबिवलीकरांना मोकळा श्वास घेणे शक्य होणार आहे. या संदर्भात एका अधिकार्याने या माहितीला दुजोरा दिला मात्र नाव उघड करु नये अशी विंनती केली.

Please follow and like us:
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email