डोंबिवली ; कामगारांच्या मृत्युच्या भितीमुळे चेंबर सफाईला नकार …
डोंबिवली दि.०२ – गेल्या महिन्यात डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा येथील सांडपाणी वाहून जाणाऱ्या चेंबरची सफाई करण्यासाठी तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा या भागातील चेंबर आता सांडपाण्याने तुडुंब भरुन वाहत आहे. डोंबिवली औद्योगिक विभागाने या चेंबरची सफाई करण्यासाठी कामगार बोलावले पण तीन कामगारांच्या मृत्युची घटना ताजी असल्याने कोणी कामगार त्या चेंबरमध्ये उतरण्यास व सफाई करण्यास तयार होत नाही यामुळे खंबालपाडा येथील सांडपाणी चेंबर सफाई कशी करुन घ्यायची असा प्रश्न औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. खांबाळपाडा येथील चेंबरची सफाई करताना देवीदास पांजरे, महादेव झोपे व चंद्रभान झोपे असे तीन कामगार मेनहोलमध्ये उतरले होते. त्या चेंबरचे प्रदुषित पाणी असल्याने कामगारांना अंदाज न आल्याने ते गुदमरुन आतमध्येच मरण पावले आता.
हेही वाचा :- डोंबिवली ; खंडणीखोर भावडांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
या भागातले चेंबर पुन्हा ओव्हरफ्लो झाले असून ते साफ करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत मात्र कोणी कामगार ते काम करण्यास तयार नाही. यासंदर्भात औद्योगिक विभागातील अधिकार्याने याला दुजोरा दिला औद्योगिक विभागातील काही कंपन्या नाल्यात कॉटन वेस्ट सोडतात व यामुळे नाल्यात पाणी तुंबते याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची गरज असून त्यानी कंपन्यांवर लक्ष दिले पाहिजे असेही त्या अधिकारऱ्याने सांगितले. कंपन्यांनी प्रदुषित पाणी नाल्यात न सोडता ते परस्पर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सेाडले पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. डोंबिवली औद्योगिक विभागातील व्हिक्ट्री नावाची कंपनी कॉटन वेस्ट नाल्यात सोडत असल्याचे समजते व या कपंनीवर नियंत्रण प्रदुषण मंडळाने ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. खंबाळपाडा येथे जेथे दुर्घटना घडली होती त्याच्या समोरच आता दुस-या चेंबरमधून सांडपाण्याचे फवारे उडत असून सर्व सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून प्रदुषण मंडळ व औद्योगिक विभाग एकमेकाकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहेत.