Dombivali ; वीजवाहिनीत बिघाड ८० हजार ग्राहकांना फटका

डोंबिवली दि.०९ :- दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी शहाराला वीजपुरवठा करणा-या महापारेषणच्या एमआयडीसी येथील १०० के. व्ही. क्षमतेच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे सुमारे ८० हजार ग्राहकांना त्या बिघाडाचा फटका बसला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.

हेही वाचा :- मृतदेहाचे तुकडे करून ७० किलोमीटर परिसरात फेकले

सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी खंडित झालेला वीजपुरवठा बिघाड दुरुस्त केल्यानंतर एक तासाने पूर्ववत झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. महापारेषणच्या पाल सबस्टेशन येथून शहरभर वीज वितरित करण्यासाठी महावितरणने आनंद नगर, बाजीप्रभू चौक आणि एमआयडीसी येथे तीन केंद्रे निर्माण केली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email