डोंबिवली ; कोपर दरम्यान  रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचा खोळंबा

डोंबिवली दि.१५ – सोमवारी  सकाळी ऐनगर्दीच्या वेळी दिवा कोपर दरम्यान  धिम्या गतीवरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचा  खोळंबा झाला. त्यामुळे धिम्या गतीवरील रेल्वे वाहतूक जलदगतीवर ठेवण्यात आली होती. रेल्वे अभियंत्यांनी तातडीने रुळ दुरुस्त केल्यानंर रेल्वे वाहतूक पुर्ववत झाली. मात्र डोंबिवली स्थानकातील प्रवाशांना जलदगती फलाटावर जाण्यासाठी धावाधाव करावी लागली. सकाळी गाड्यांचे काहीवेळा वेळापत्रक पुरते विस्कटले.

हेही वाचा :- डोंबिवली ; धुसखोर चालकांच्या दादागिरीला पोलीसांचे अभय

सोमवारी सकाळी ८.१४ च्या सुमारास कोपर  ते दिवा दरम्यान दातीवली शंकर मंदिर , कि.मी.नंबर ४३/३२व ४३/३४ येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गतीवरील रेल्वे रुळाला तडा गेला. रेल्वे मोटरमनच्या लक्षात हि बाब आली. त्यानंतर रेल्वे अभियंता व  गँगमन यांनी रेल्वे रुळ तातडीने दुरुस्त केले.८.४३ वाजता रेल्वे रळाचे कामकाज पुर्ण झाले. तोपर्यंत डोंबिवली स्थानकापुढील मुंबई व ठाण्याकडे जाणारी वाहतूक जलदगती मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस चाकरमान्यांना जलदगती फलाटावर गाडी पकडण्यासाठी धावाधाव करावी लागली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email