डोंबिवली ; एल आय सी एजेंट असल्याचा बतावणी करत वृद्ध इसमाचा मोबाईल लंपास
डोंबिवली दि.०३ – डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड अनुपम सोसायटी मध्ये राहणारे सुरेश मुजुमदार ७२ हे सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरात आपल्या पत्नीसह एकटे असताना एक अज्ञात इसम घरात आला त्याने आपण एल आय सी एजेंट असल्याचे सांगत तुमचा चेक आला आहे असे सांगितले.
हेही वाचा :- डोंबिवली ; धूम स्टाईल लुटारूंचे थैमान
त्याने मुजुमदार यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पत्नीला पाणी आणण्यास सांगितले. व संधी साधत त्याने मुजुमदार यांचा मोबाईल चोरून तेथून पळ काढला या प्रकरणी मुजूमदार यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: