डोंबिवली ; नोकराणी मालकाला सुमारे १३ लाखाना गंडवले
डोंबिवली दि.०७ – आपल्याला मालकाचा विश्वास संपादन करत दोन भामट्या नोकरांनी मालकाला तब्बल १२ लाख लाख ७० हजार ५३१ रुपयांना गंडवल्याचा प्रकार कल्याणात उघडकीस आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानाकात सरफराज शेख व आसिफ खान या दोघा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुजरात येथील अहमदाबाद येथे राहणारे राजकुमार ढोलानी यांचे कल्याण पश्चिम वल्लीपिर रोड सर्वोदय बिल्डिंग येथे टीव्हीचे गोडावून आहे. एप्रिल महिन्यापासून या गोडावून मध्ये जोगेश्वरी येथे राहणारे सरफराज शेख व कल्याणात राहणारा आसिफ खान हा काम करत होता.
हेही वाचा :- डोंबिवलीत घरफोडी
या दोघा भामट्या नोकरांनी ढोलणी यांच्या नकळत गोडावून मधील १२ लाख ७० हजार ५३१ रुपयांचे टीव्हीचा परस्पर अपहार केला. सदर बाब निदर्शनास आल्या नंतर ढोलणी यांनी या दोघांना जाब विचारला यावेळी बिंग फुटल्याने संतापलेल्या सरफराज शेख व आसिफ खान या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सरफराज शेख व आसिफ खान या दोन भामट्या नोकरा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.